Tue. Sep 27th, 2022

‘ममता बॅनर्जी यांना स्वतःचे विचार मांडण्याचा अधिकार’ – पृथ्वीराज चव्हाण

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममती बॅनर्जी यांना स्वत:चे विचार मांडण्याचा अधिकार असल्याचे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत, तसेच भाजप नेत्यांनी भाजपपेक्षा काँग्रेसला जास्त विरोध केला असल्याचे ते म्हणाले.

आगामी निवडणूकीत मोदी सरकारला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे असून त्याला नाव यूपीए द्या अन्यथा काहीही द्या, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना स्वत:चे विचार मांडण्याचा अधिकार आहे. वाजपेयी सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद मिळाले होते. त्यानंतर भाजप नेत्यांनी भाजपपेक्षा काँग्रेसला जास्त विरोध केला. येत्या आगामी निवडणुकीमध्ये भाजप पक्षाला पराभव केले नाही तर देशात लोकशाही जिवंत राहणार नाही, त्यामुळे सर्व विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस संपूर्ण देशात आहे इतर प्रादेशिक पक्ष एका राज्यापुरते आहेत त्यामुळे पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा असणे गैर नसल्याचेही ते म्हणाले.

1 thought on “‘ममता बॅनर्जी यांना स्वतःचे विचार मांडण्याचा अधिकार’ – पृथ्वीराज चव्हाण

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.