Tue. Dec 7th, 2021

दीदींना ‘जय श्रीराम’ची 10 लाख पत्रं, पोस्ट ऑफिस हैराण!

ममता दीदींना श्रीरामचंद्रांच्या नावाचंही वावडं आहे. त्यामुळे ‘जय श्रीराम’ म्हणणाऱ्यांना दीदी कैदेत टाकत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. यानंतर ममता दीदी आणि भाजपामध्ये वॉर सुरू झालं आहे. मध्यंतरी कार्यालयासाठी त्यांच्यात वाद झाला होता. तर जय श्री राम च्या नावाला त्या विरोध करतात म्हणून ममतादीदींना जय श्री राम लिहून पोस्टकार्ड पाठवण्यात येत आहेत. याचा त्रास पोस्ट ऑफीसला होत आहे. कारण अशी 10 लाख पोस्टकार्ड पोस्टात येवून पडली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल कांग्रेसमध्ये चांगलच युद्ध रंगल आहे. जय श्री राम च्या नाऱ्याला ममतादिदी विरोध करते असा आरोप भाजपने केला आहे.

लोकसभा निवडणूकीत भाजपने 18  जागा जिंकल्या. त्यामुळे दोन्ही पक्षातील वाद अधिकचं पेटला आहे. भाजप, बजरंग दलाचे कार्यकर्ते देशभरातून ममता बॅनर्जी यांना जय श्री राम लिहून पोस्टकार्ड पाठवत आहेत.

भाजपच्या या पत्रव्यवहारामुळे दक्षिण कोलकात्ता इथल्या पोस्ट ऑफीसच्या कर्मचाऱ्यांच्या डोक्याला ताप झाला आहे. या पोस्ट ऑफीसमध्ये ममता दीदीच्या नावाने दररोज रेकॉर्ड ब्रेक पत्र येत आहेत.

हे पत्र ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या पोस्ट ऑफीस कार्यालयाने स्पेशल एका पोस्टमनची नियुक्ती केलीये.देशभऱातून भाजप कार्यकर्त्यांनी १० लाख पोस्टकार्ड ममता दिदीला पाठवलेत.या सर्व पोट्सकार्डमध्ये केवळ ‘जय श्री राम’ लिहीण्यात आलंय.

दूसरिकडे तृणमूल कॉग्रेसकडून या पत्राला उत्तर देण्याचं काम सुरु आहे.भाजपच्या ‘जय श्री राम’ ला ‘जय हिंद, जय बांग्ला’ या नाऱ्याने टक्कर दिली जात आहे.हावड़ा, हुगळी इथून दिवसाला 8 हजार पत्रांना उत्तर पाठवलं जातय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *