Jaimaharashtra news

“कुणीही येतंय चड्डा, नड्डा, फड्डा, भड्डा”; ममता बॅनर्जींची भाजपावर टीका

वृत्तसंस्था, पश्चिम बंगाल: गुरुवारी पश्चिम बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर सडकून टीका केलीय. तर या हल्ला पूर्वनियोजित कट असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय.


एकीकडे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नड्डांच्या ताफ्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजपावर निशाणा साधत भाजपाच्या नेत्यांकडे आणि कार्यकर्त्यांकडे काही काम नसल्याचा टोला लगावला आहे. कधी इथे केंद्रीय गृहमंत्री येतात तर कधी चड्डा, नड्डा, फड्डा, भड्डा. जेव्हा त्यांच्याकडे कोणी प्रेक्षक नसतात तेव्हा ते त्यांच्या कार्यकर्त्यांना नौटंकी करण्यासाठी बोलवतात,” असंही ममता यांनी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात बोलताना म्हटलं आहे.


“तुमच्या नेत्यांचं इथे स्वागत आहे. मात्र आम्ही हिंसेला विरोध करतो. तुमच्या ताफ्यामागे ५० गाड्या का होत्या? बाईक आणि प्रसारमाध्यमांचा गाड्या का होता? तिथे कोण उभं होतं? दगड कोणी फेकले? ते सर्व नियोजित होतं का? तुम्ही खूप हुशार आहात,” कोलकात्यामधील मायो रोड येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर दिलेल्या भाषणामध्ये म्हटलं आहे. दरम्यान झालेल्या गोळीबारात ळी लागल्याने भाजपाच्या एका कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ममता यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.


सर्व केंद्रीय यंत्रणा हाताशी असताना भाजपाला स्वत:च्या पक्षाध्यक्षांचे संरक्षण करता येत नाही याबद्दल आश्चर्य वाटत असल्याचं ममता यांनी म्हटलं आहे. दरम्यान, भाजपाच्या अनेक मंत्र्यांनी पश्चिम बंगालमधील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्न उपस्थित करत सत्ताधारी तृणमूलवर निशाणा साधला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. झे प्लस सुरक्षा असताना नक्की काय गोंधळ झाला याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आलेत.
डायमंड हार्बरला जाताना नड्डा यांच्या गाडीवर हल्ला झाला. हल्ला झाला तो परिसर तृणमूलचे खासदार आणि ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांचा मतदारसंघ आहे. “लोकांना भाजपा आवडत नाही तर मी काय करु शकतो?,” असा प्रश्न बॅनर्जी यांनी या हल्ल्यासंदर्भात बोलताना उपस्थित केला आहे.

Exit mobile version