Wed. May 19th, 2021

महिलांवर ‘ममता’ … 41 % महिलांना तिकीट !

केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकींच्या तारखा जाहीर केल्या आहेत. लोकसभा निवडणुका देशात सात टप्प्यांमध्ये होणार आहे. काही दिवसांतच लोकसभा निवडणुका असल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. तसेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांनी आपले उमेदवार निश्चित करण्यास सुरुवात केली आहे.  तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी  मंगळवारी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे.  ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीत 42 जागांची यादी जाहीर केली असून त्यात 41 टक्के  महिला उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी ?

लोकसभा निवडणुकांसाठी पक्षांनी आपले उमेदवार  निश्चित करण्यास सुरुवात केली आहे.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी  मंगळवारी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली.

ममता बॅनर्जी यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीत नारी शक्तीला अधिक प्राधान्य देण्याचे ठरवले आहे.

लोकसभा निवडणुकीत 41  टक्के महिलांना तिकीट देणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

माझ्या पक्षासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचं त्या म्हणाल्या.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुका  सात टप्प्यांत होणार आहेत.

बंगालमध्ये 42 जागास असून तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत होणार आहे.

याआधी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी 33 टक्के महिलांना तिकीट देण्याचे जाहिर केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *