Wed. May 18th, 2022

साताऱ्यात गर्भवती महिलेला मारहाण करण्याऱ्याला अटक

साताऱ्यातील पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली होती. त्यानंतर सातारा तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रामचंद्र जानकरला शिरवळ येथून आणि त्याची पत्नी प्रतिभा हिला सातारा येथून अटक केली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांनी दिली आहे.

गर्भवती महिलेला मारहाण केल्याप्रकरणी माजी सरपंच रामचंद्र जानकर या आरोपीस रात्री तीन वाजताच्या सुमारास पोलिसांनी अटक केली असून सकाळी त्याच्या पत्नीस पोलिसांनी ताब्यात घतले आहे.

साताऱ्यातील गर्भवती महिलेला महिलेला मारहाण करणाऱ्या घटनेचा व्हिडिओ जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीवर प्रसारित झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गंभीर दखल घेत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना केल्या आहेत.

साताऱ्यातील वनरक्षक मारहाणी करणाऱ्या माजी सरपंचाला अटक करण्यात आली असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत दिली आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘आरोपीला गुरुवारी सकाळी अटक करण्यात आली असून त्याला कायद्याचा कठोरारपणे सामना करावा लागणार आहे. असे कृत्य अजिबात खपवून घेतले जाणार नाही’.

काय आहे प्रकरण?

साताऱ्यात पळसवडे गावच्या माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही वनरक्षक महिला ३ महिन्यांची गर्भवती असून त्यांच्या पोटात लाथा मारण्यात आल्या आहेत. तर डोक्यात दगड मारल्यामुळे त्या रक्तबंबाळ झाल्या आहेत. मला न विचारता मजूर दुसरीकडे का नेले? या कारणातून चिडून वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी आणि त्यांची पत्नी प्रतिभा जानकर यांनी गर्भवती महिला वनरक्षक सानप यांना मारहाण केली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.