Tue. Sep 17th, 2019

धक्कादायक! 26 मुलींची सौदी अरेबियाला तस्करी

0Shares

बनावट कागदपत्रांद्वारे 26 मुलींची सौदी अरेबियाला तस्करी करणाऱ्या एका इसमाला मुंबईतील भायखळा परिसरात अटक करण्यात आली आहे. नजमुल हसन नाजमी असं या 67 वर्षीय आरोपीचं नाव आहे.

 

‘ट्रायोटेक कन्सल्टन्ट’चं खरं रूप!

ट्रायोटेक कन्सल्टन्ट या कंपनीद्वारे टुरिस्ट व्हिजा देऊन एका मुलीला सौदी अरेबियाला पाठवण्यात आलं.

मात्र तिला तिथे गेल्यावर गैरकृत्य करण्यास भाग पाडलं गेलं.

यासंदर्भात या मुलीने आपल्या आईकडे फोनवरून तक्रार केली.

आईने दिल्लीच्या इमिग्रेशन विभागात यासंदर्भात तक्रार नोंदवली.

या मुलीची त्यानंतर सुटका करण्यात आली.

मात्र या घटनेनंतर ‘ट्रायोटेक कन्सल्टन्ट’ भोवती संशयाचं जाळं गडद झालं.

या कंपनीकडून पाठवल्या गेलेल्या प्रवशांची माहिती काढण्यास सुरूवात झाली.

त्यावेळी 26 मुलींची सौदी अरेबियाला तस्करी करून त्यांच्याकडून गैरकृत्यं करवली गेल्याचं निष्पन्न झालं.

या कंपनीचा खरा मालक काही वर्षापूर्वीच मृत्यू पावल्याची आणि त्यानंतर या कंपनीचा परवानाही तात्पुरता निलंबित केला गेल्याचं आढळून आलं.

आरोपी शोधण्यास पोलिसांनी सुरुवात केली.

माझगाव येथील ऑफिसचा त्याचा पत्ता समजल्यावर त्याचं घर शोधण्यास सुरूवात झाली.

कुर्ला येथे राहणाऱ्या नाझमुल याला अखेर या प्रकरणी अटक करण्यात आलंय.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *