Sat. Jul 31st, 2021

बायकोचा राग निघाला मेव्हण्यावर, मेव्हण्याला बेदम मारहाण

संसार म्हटला की भांडण हे होणारच. पती पत्नीमध्ये भांडण हे सारखीच होत असतात. मात्र काही वेळा ही भांडणे एवढी विकोपाला जातात की, त्यातून हाणामारीच्या घटना घडतात.

अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान पती पत्नी मध्ये झालेलं घटस्फोटाचं भांडण हे शिगेला पोहचल्याची घटना घडली आहे.

यात पतीच्या कुटुंबाने पत्नीच्या माहेरच्यांना बेदम मारहाण केली आहे. वसई पोलीस ठाण्यात पती आणि त्याच्या कुटुंबा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

वसई पश्चिमेच्या वसई गाव परिसरात जैस्वाल कुटुंबात पती पत्नीच्या घटस्फोटावरून वाद झाला. हा वाद थेट सोमवारी रात्री हाणामारीवर पोहचलेला पाहायला मिळाला.

त्यात पत्नीचा सख्खा भाऊ गंभीर झखमी झाला. हे सर्व जैस्वाल कुटुंब राहत असलेल्या इमारतीतील  CCTV केमेऱ्यात कैद झाले आहे.

कशाप्रकारे पतीनं आपल्या पत्नीचा सख्ख्या भावाला पट्ट्याने मारहाण केली आहे. सदर घटने विषयी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *