Tue. Jun 2nd, 2020

…आणि PUBGसाठी त्याने सोडलं कुटुंब!

PUBG गेमने जगभरातील तरुणांना वेड लावले आहे.

‘PUBG’ गेम खेळताना पत्नी आणि कुटुंबाचा अडथळा येतोय म्हणून एका तरुणाने चक्क 4 महिन्याची गरोदर पत्नी आणि कुटुंबाला सोडल्याची धक्कादायक घटना मलेशियात उघडकीस आली आहे.

मलेशिया येथील एका तरुणाला PUBG खेळण्याचे व्यसन लागले होते. तो सतत PUBG गेम खेळायचा.

PUBG गेम खेळत असताना कुणीही अडथळा आणू नये, असे तो वारंवार कुटुंबांतील व्यक्तींना सांगायचा.

विवाहित असलेला हा तरुण कोणताही कामधंदा करीत नव्हता.

या तरुणाला PUBG खेळण्याचे व्यसन जडले होते. PUBG चा कोटा कोणत्याही अडथळाविना पूर्ण करता यावा यासाठी तो घरातून निघून गेला आहे.

या तरुणाच्या पत्नीने फेसबुकवर एक पोस्ट टाकल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

या महिलेनी मलाय भाषेत ही पोस्ट लिहिली असून ‘PUBG’ गेम खेळण्यासाठी अडथळा नको म्हणून पती घर सोडून गेल्याचे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

ही महिला 4 महिन्याची गरोदर आहे. पतीने PUBGसाठी घर सोडून आता एका महिना झाला आहे.

हा तरुण 4 वर्षापासून गेम खेळत होता. या तरुणाला PUBGचे व्यसन लागल्याने तो कोणतेही कामधंदा करीत नव्हता.

PUBGच्या आधी तो ऑनलाइन गेम खेळत असल्याचेही त्याच्या पत्नीने या फेसबुक पोस्टमध्ये सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *