Tue. Sep 28th, 2021

‘रोड शों’नाच नव्हे, ‘इच्छाधारी नागा’च्या विवाहालाही झाली होती वाराणसीत गर्दी!

सध्या पंतप्रधान आणि दिग्गज नेत्यांच्या रोड शोंमुळे वाराणसीमध्ये गर्दी जमा होताना दिसते. मात्र 2015 साली एका विचित्र गोष्टीसाठी हजारोंची गर्दी जमा झाली होती. ही गर्दी होती इच्छाधारी नागाचं लग्न पाहाण्यासाठी आलेल्या लोकांची…

2015 साली इच्छाधारी नागाच्या लग्नासाठी जमली होती अशी गर्दी!

सुमारे चार वर्षांपूर्वी वाराणसीपासून 30 किमीवर असलेल्या राजपूर या गावातील शिवमंदिरात शनिवारी इच्छाधारी नाग आणि नागिणीचा विवाह होत असल्याची अफवा पसरली होती.

ही अफवा पसरताच हजारोंच्या संख्येने लोक या लग्नासाठी जमा झाले.

या इच्छाधारी नागांच्या लग्नासाठी इतकी गर्दी झाली, की कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली.

त्यामुळे एक नव्हे, तर पाच पाच पोलीस ठाण्यातील पोलिसांना पाचारण करावं लागलं.

पहाटेपासून या ठिकाणी लोकांनी गर्दी होऊ लागली.

या गर्दीला पांगवण्यासाठी अलाहबाद, चंदोली, सोनभद्र इत्यादी पाच पोलीस स्टेशनच्या पोलिसांना यावं लागलं.

कोण होता हा इच्छाधारी नाग?

प्रत्यक्षात हे लग्न होतं संदीप पटेल नामक युवकाचं.

याच युवकाने आपण इच्छाधारी नाग असल्याचं जाहीर केलं होतं.

संदीप याला अर्धांगवायूचा झटका आला होता.

त्यामुळे तो सापासारखा सरपटत चालतो.

संदीपने याच गोष्टीचा फायदा उठवत आपण इच्छाधारी नाग असल्याचं आणि इच्छाधारी नागिणीशी विवाह करत असल्याची अफवा पसरवली.

दोन इच्छाधारी नागांचं शिवशंकराच्या मंदिरात होणारा विवाह पाहण्यासाठी दूरवरून लोक आले.

अखेर पोलिसांनी या अफवा पसरवणाऱ्या संदीप पटेल आणि त्याच्या वडिलांना नजरकैद केलं होतं.

बॉलिवूड सिनेमांमधून आणि लोकप्रिय टीव्ही मालिकांमधून तुम्ही इच्छाधारी नागांच्या कथा अनेकदा पाहिल्या असतील. मात्र इच्छाधारी नाग प्रत्यक्षात असतात का, याचं उत्तर जीवशास्त्रामध्ये तरी ‘नाही’ हेच आहे. तरीही देशात अजूनही अंधश्रद्धाळूंचं प्रमाण खूप जास्त आहे. चार वर्षापूर्वीची ही घटना त्याचंच द्योतक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *