Wed. Aug 21st, 2019

या कारणास्तव तरूणाला जीवंत जाळले!

0Shares

जाळून मारण्याच्या घटना काही नविन नाहीत, अशातच सेलू तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे नालीच्या जुन्या वादातून तरुणास जाळून मारण्याची घटना घडली आहे. सतिष दत्तराव बरसाले (वय ३५ ) असे व्यक्तीचे नाव असून,  रस्त्याने ट्रॅक्टर घेऊन जात असताना मधेच रस्त्यात अडवून त्याला जीवंत जाळून मारण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

सतिष दत्तराव बरसाले हा सेलू तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील रहिवासी होता.

सतिष सेलू येथील वालुर रोडवरून ट्रॅक्टरने जात असताना काही लोकांनी त्यांना अडवून बेदम मारहाण केली.

केवळ त्या लोकांनी इथवर न थांबता ट्रॅक्टर मधील डिझेल सतिषच्या अंगावर टाकून त्याला जिवंत जाळले.

या घटनेमागे गावातील जुन्या नालीचा वाद असल्याचे कारण समोर आले आहे.

या संदर्भात घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

वादातून जाळून मारण्याच्या घटना ह्या वारंवार पाहायला मिळतात, कधी आंतरजातीय विवाह , कधी रागाच्या भरात तर कधी दारूच्या नशेत या घटना घडल्याचे दिसून आले आहे.

या घटनेत मात्र वादाच्या कारणामुळे जाळल्याचे समोर आले आहे.

 

 

 

 

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *