Wed. Dec 8th, 2021

नांदेडमध्ये पोलिस ठाण्यासमोरच व्यापाराने घेतले पेट’वून

पोलिस ठाण्यासमोर अंगावर राँकेल ओतून एका तरुण व्यापाऱ्याने पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. हिमायतनगर येथे काल रात्री ही घटना घडली आहे.

पोलिस ठाण्यासमोर अंगावर राँकेल ओतून एका तरुण व्यापाऱ्याने पेट’वून घेतल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. हिमायतनगर येथे काल रात्री ही घटना घडली आहे. सद्दाम शेख अहमद असं या तरुणाचं नाव आहे. कौटुंबिक वादातून त्याने असं कृत्य केल्याची चर्चा करण्यात येत आहे. पोलीसांनी मात्र आत्मह’त्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

नांदेडमध्ये अंगावर राँकेल ओतून घेऊन स्वतःला एका तरुण व्यापाऱ्याने थेट पोलिस ठाण्यासमोरचं पेट’वून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हिमायतनगर येथे काल रात्रीच्या सुमारास ही घडली आहे. आत्मह’त्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलीसांनी म्हटलं आहे.

हिमायतनगर पोलिस ठाण्याच्या समोर येऊन सद्दाम शेख अहमद याने रॉकेल तेल ओतून घेवून पेट’वून घेतले.

यावेळी पोलीसांनी तात्काळ आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र शेख याला वाचविण्यात पोलीसांना अपयश आलं आहे.

आगीत शेख सद्दाम हा 90 टक्के भाजल्याने त्याला पुढील उपचारासाठी नांदेड शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.

कौटुंबिक वादातून शेख सद्दाम यांनी पेटवून घेतल्याच्या चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *