Thu. Oct 21st, 2021

6 दिवसांपूर्वी सुर्या नदीत वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह अखेर सापडला

जय महाराष्ट्र न्यूज, पालघर

पालघरच्या सुर्या नदीत वाहून गेलेल्या सुभाष घरत यांचा मृतदेह शोधण्यात अखेर यश मिळालं. सुभाष यांचा मृतदेह परगावच्या खाडीत आढळला.

 

सहा दिवसांपूर्वी मासवनच्या सुर्या नदीत सुभाष घरत यांचा बुडून मृत्यू झाला होता. वसई-विरार महानगरच्या पाणी पुरवठा विभागात सुभाष घरत कार्यरत होते.

 

बाईकवरुन घरी जाताना नदीच्या प्रवाहात ते वाहून गेले होते. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि स्थानिकांच्या अथक प्रयत्नांनंतर घरत यांचा मृतदेह हाती लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *