Sun. Sep 19th, 2021

गरोदर पत्नीची हत्या करून पती झोपला मृतदेहाशेजारी!

उमरगा तालुक्यातील मुरुम येथे गरोदर पत्नीचा गळा आवळून पतीने हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतरही पती रात्रभर पत्नीच्या मृतदेहाशेजारी झोपून राहिला.

सकाळी उठून स्वतः पोलिस ठाण्यात पतीने खून केल्याची कबूली दिली.

ही घटना 8 जानेवारी रोजी रात्री घडली.

विनोद धनसिंग पवार असं आरोपी पतीचं नाव आहे.

त्या रात्री नेमकं काय घडलं?

 • विनोद याचा मुरूम येथे बोअरवेल कमिशन एजंटचा व्यवसाय होता.
 • प्रियंका ही तुळजापूर येथे नर्स होती .
 • नुकतीच प्रियंकाची उमरगा येथे बदली झाली होती. पण रिलीज करण्यात आलं नव्हतं.
 • गुरूवारी रात्री प्रियंका ड्युटी करुन मुरूम येथे घरी आली.
 • विनोद रात्री उशिरा दारूच्या नशेत घरी आला.
 • बदली प्रकरणावरून दोघांत वाद झाला.
 • पत्नी नेहमीच किरकोळ कारणावरून आपणास टोचून बोलते याचाही विनोदच्या मनात राग होता.
 • या रागातून त्याने प्रियंकाचा गळा दाबून खून करून मृतदेहा शेजारीच झोपी गेला.
 • शुक्रवारी सकाळी स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन कबूली दिली.
 • घटनेची माहिती मिळताच मृत महिलेच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली.
  या प्रकरणी आरोपी पतीस पोलिसांनी ताब्यात घेतलं. शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *