Wed. May 12th, 2021

तृतीयपंथी, बेपत्ता पती आणि Tik Tok…!

तरुणाईला लागलेल्या Tik Tok च्या व्यसनामुळे  Tik Tok वर बंदी घालण्याचा मुद्दा मध्यंतरी गाजला होता. मात्र तामिळनाडूमध्ये याच Tik Tok मुळे एका महिलेला तिचा 3 वर्षांपूर्वी एकाएकी बेपत्ता झालेला पती सापडलाय. मात्र या पतीचं बेपत्ता होण्याचं कारण मात्र वेगळंच होतं.

नेमकं प्रकरण काय?

एका महिलेला पती 2016 साली एकाएकी बेपत्ता झाला होता.

या प्रकरणी त्या महिलेने पोलिसांत तक्रारही केली होती.

जयाप्रदा असं या महिलेचं नाव असून सुरेश हे तिच्या पतीचं नाव आहे.

मात्र काही दिवसांपूर्वी सुरेशचा एका महिलेसोबतचा Tik Tok व्हिडीओ जयाप्रदाच्या नातेवाईकाने पाहिला.

नातेवाईकाने याबाबत जयाप्रदाला माहिती दिली.

तिने तो व्हिडिओ पोलिसांना दाखविला.

त्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी सुरेशला शोधलं आणि पत्नीसमोर हजर केलं.

तेव्हा सुरेशने आपलं एका तृतीयपंथीयासोबत अफेयर असल्याचं सांगितलं. तसंच या तृतीयपंथीसोबत राहण्यासाठी पत्नी आणि मुलांना सोडून पळून गेल्याचं कबूल केलं.

त्यानंतर विवाह समुपदेशकाकडून सुरेश आणि जयाप्रदा यांचं समुपदेशन करण्यात आलं. त्यानंतर सुरेश पुन्हा आपल्या पत्नीसोबत राहण्यास तयार झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *