Jaimaharashtra news

प्रेमाची 1 नजर, 4000 पोस्टर्स…

पुण्यातील एका प्रियकराने काही दिवसांपूर्वी प्रेयसीची माफी मागण्यासाठी ‘शिवडे मला माफ कर!’, असे पोस्टर्स रोडवर लावले होते. आता अशीच एक घटना कोलकाता शहरात घडली आहे.

राज्य पर्यावरण विभागात काम करणाऱ्या बिश्वजीत पोद्दार हा एका मुलीच्या प्रेमात पडला. ऑफीसमधून घरी जाताना त्याने रेल्वेमध्ये तरूणीला पाहिले आणि पहिल्या नजरेत प्रेम झाले. त्या तरूणीला शोधण्यासाठी त्याने कोलकातामधील कोन्नगर आणि बल्ली या मार्गावर ४ हजार पोस्टर्स लावली. तसेच त्याने युट्यूबवर सात मिनिटांची फिल्म तयार करून अपलोड केली आहे. 

या फिल्मच्या शेवटी असे दाखवले आहे की पोद्दार त्या मुलीला सांगतोय, ‘मी स्टेशनवर तूझी वाट पाहत आहे, जर तू ही फिल्म पाहत असशील तर मला संपर्क कर.’ पोद्दार याने या चित्रपटाचे नाव ‘कोन्नगर कोने (कोन्नगरची वधू)’ असे दिले आहे.

Exit mobile version