Jaimaharashtra news

किरकोळ वादामुळे धावत्या रेल्वे गाडीतून युवकाला दिले फेकून

गोवा एक्सप्रेस रेल्वे गाडीत पिण्याच्या पाण्यावरुन दोन युवकांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका युवकाला धावत्या रेल्वेतून फेकून दिल्याची धक्कादायक घटना आज दौंड रेल्वेच्या हद्दीत घडली, यात एक जणाचा जागीच मृत्यू झालाय.. ३३ वर्षीय गजानन राठोड असे फेकून दिलेल्या युवकाचे नाव आहे.. या प्रकरणी दौंड लोहमार्ग पोलिसांनी एकास अटक केली आहे.
मनमाडकडून पुण्याकडे जाणारी गोवा एक्सप्रेस उशीरा धावत असल्यामुळे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास गोवा एक्सप्रेस रेल्वे दौंड स्टेशनला दाखल झाली होती. यावेळी गजानन राठोड याने नितीन जाधवकडे पिण्यासाठी बाटलीतील पाणी मागीतले मात्र नितीनने पाणी दिले नाही. या किरकोळ कारणावरुन गजानने नितीनच्या कानशिलात मारली, आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि केडगाव स्टेशन येण्याच्या अगोदर गजाननला नितीनने रेल्वे डब्यातील स्वच्छता गृहाजवळ आणले आणि धावत्या गाडीतून त्याला खाली ढकलून दिले.
यात गजानन राठोड यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दौंड लोहमार्गाचे पोलीस निरीक्षक युवराज कलगुटगे यांनी दिली आहे.

Exit mobile version