Wed. Jun 26th, 2019

अन्नात पनीरऐवजी plastic… Zomato चं नेमकं

0Shares

औरंगाबाद शहरात एका ग्राहकाने Zomato वरून पनीर चिली मागवली. मात्र त्याला खायला मिळाले, ते प्लास्टिकचे तुकडे! या धक्कादायक प्रकाराबाबत जिन्सी पोलीस ठाण्यात Zomato आणि hotel विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सचिन जमधडे असे तक्रार करणाऱ्या ग्राहकाचे नाव आहे.

कसा लक्षात आला हा प्रकार?

काल सायंकाळी त्यांनी Zomato वरून पनीर चिली आणि इतर काही पदार्थांची ऑर्डर केली होती.

घरी पदार्थ Zomato तर्फे deliver करण्यात आला.

मात्र जेवताना पनीर तुटत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

नीट निरखून पाहिलं असता हा पदार्थ पनीर नसल्याचं लक्षात आलं.

हे ही वाचा-  पार्सलमधून चोरुन डबा खाणं झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला पडलं महागात

 

 Hotel ने झटकले हात!

सचिन जगधडे यांनी संबंधित हॉटेल गाठून चौकशी केली.

मात्र हॉटेल चालकाने उडवा उडवीची उत्तरं दिली.

हॉटेल ‘एस स्क्वेअर’ असं या हॉटेलचं नाव आहे.

त्यानंतर ग्राहक सचिन जगधडे यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

प्लास्टिकसदृश असणारा पदार्थ FDAकडे तपासणीसाठी देण्यात आला आहे.


हे ही वाचा- 
ऑनलाइन फूड ऑर्डर करताय? सावधान!


Zomato वरील यापूर्वीचे आरोप

यापूर्वीही Zomato च्या एका डिलीव्हरी बॉयचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत डिलिव्हरी बॉय स्वतःच ग्राहकांसाठी नेत असलेला पदार्थ चोरून खात होता. हा video viral झाल्यावर Zomato ला या गोष्टीचा मोठा फटका बसला होता. तसंच Swiggy, Zomato यांसारख्या कंपन्या निकृष्ट दर्जाचं अन्न deliver करत असल्याचंही मध्यंतरी उघडकीस आलं होतं. त्यानंतर आता अन्नात पनीर ऐवजी प्लास्टिक आढळल्यामुळे Zomato वर पुन्हा एकदा संक्रांत आली आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: