Fri. Feb 21st, 2020

गर्लफ्रेंडचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल, तरूणावर गुन्हा दाखल

प्रेमसंबंध संपल्यानंतर तरुणाने आपल्या Ex-Girlfriend चे अश्लील फोटो Social Media वर viral केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित तरूणावर गिट्टीखदान पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ हीच घटना नसून वेगवेगळ्या ठिकाणी आणखी दोन विनयभंगाच्या घटनांची पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं ?

एका तरूणीचे अश्लील फोटो Social Media वर टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पीडित तरूणी 26 वर्षीय असून तिचे आरोपीसोबत पूर्वी प्रेमसंबंध होते.

या तरुणीशी रिलेशनशिपमध्ये असतानादेखील असताना देखील आरोपी या पीडीत तरूणीव्यतिरिक्त इतर मुलींसोबत संबंध ठेवून होता.

या विषयी कळताच तरूणीने त्याला जाब विचारला आणि यापुढे बाहेरख्याली न करता आपल्याशीच प्रामाणिक राहण्याचं वचन तिने मागितलं.

मात्र तरुणीला वचन देण्याऐवजी उलट आरोपीने आपल्या गर्लफ्रेंडशी Break-up केला.

इतकंच नाही तर त्याने Instagram वर ‘फेक अकाउंट’ उघडून तीचे आपल्यासोबतचे अश्लील फोटो पोस्ट करत तिची बदनामी केली.

हे फोटो पोस्ट करण्यासाठी आरोपीने उघडलेलं फेक अकाउंट दुसऱ्या तरूणीच्या नावे होतं.

घडलेला प्रकार लक्षात येताच पीडीतेने सरळ पोलिस स्टेशन मध्ये तक्रार केली.

याप्रकरणी पोलिसांनी विनयभंग आणि Cyber गुन्हे कायद्यांतर्गत संबंधित तरूणावर गुन्हा दाखल केला आहे.

विनयभंगाच्या आणखी दोन घटना उघडकीस

विनयभंगाच्या एका घटनेत हेमंत नंदन ठाकूर या 20 वर्षीय तरूणाने पीडितेला एका ठिकाणी बोलावून तिच्यासोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला.

अंबाझरी पोलीस ठाण्यात संबंधीत तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर विनयभंगाच्या दुसऱ्या घटनेत, पीडित तरूणी रात्री घरी झोपली असताना तिच्या वस्तीत राहाणारा तरुण अचानक तिच्या घरी घुसला.

त्या तरूणाने पिडीत तरूणीच्या घरात घुसून तिच्याशी तो अश्लील चाळे केले.

तिला जाग येताच तिने आरडाओरडा केला. तेव्हा आरोपी पळून गेला.

संबंधीत तरूणाचे नाव गौरव असून त्याच्याविषयी हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *