Mon. Sep 27th, 2021

अन् त्याने स्टेडीयमवरच केले प्रपोज….

मॅनचेस्टरमध्ये फादर्स डे च्या दिवशी भारत पाकिस्तान सामना चांगलाच रंगात आला होता. यावेळी भारताने पाकिस्तानवर 89 धावांनी विजय मिळवला होता. या दोन संघांमध्ये लागलेली झुंज पाहण्यासाठी मैदानावर लाखो चाहते जमले होते. तेव्हा तेथे सामना पाहण्यासाठी एक जोडपे बसले होते. त्याचदरम्यान त्या प्रेमीयुगूलातील तरुणाने संधीचा फायदा साधत आपल्या प्रेयसीला प्रपोज केले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनीही त्यांच्या आनंदात आपला सहभाग दर्शवला.

असा टिपला तो गोड क्षण

क्रिकेट सामन्यांच्यावेऴी कॅमेरामॅन नेहमीच स्टेडीयमवरील निरनिराळ्या खुबी टिपत असतात.

तेव्हा अशाच एका कॅमेरामॅनने भारत-पाकीस्तान सामना सुरु असताना या प्रेमीयुगूलाचाही सुंदर क्षण टिपला.

World Cup 2019 सुरू असून मैदानावर खेळाबरोबरच एका तरुणाने चक्क स्टेडीयममध्ये लग्नासाठी प्रपोज केल् आहे. महामुकाबला भारत आणि पाकिस्तानमध्ये रंगलेल्या सामन्यात प्रेक्षकांमध्येही एक प्रेमाची गोष्ट रंगली. एका तरुणाने चक्क आपल्या प्रेयसीला स्टेडीयममध्ये लग्नासाठी प्रपोज केल्याचे समजते आहे.

नेमकं काय घडलं ?

एकीकडे भारत-पाकिस्तानमध्ये सामना रंगत असताना दुसरीकडे एका तरुणाने आपल्या प्रेयसीला प्रपोज केले.

तरुण आपल्या प्रेयसीला स्टेडीयमवर लग्नासाठी मागणी घालत असतानाच कॅमेरा त्यांच्याकडे फिरवण्यात आला.

दरम्यान हा प्रेमळ क्षण स्टेडीयमवर लावण्यात आलेल्या मोठ्या पडद्यावरही दाखवण्यात आला.

तसेच प्रेयसीनेही प्रियकराने घातलेल्या मागणीला होकार दिल्याने तेथील उपस्थितांनीही त्यांच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट केला.

त्यामुळे प्रियकराने अनोख्या पध्दतीने केलेल्या या प्रपोजचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला.

हा व्हिडीओ स्वत: त्या प्रेयसीने ट्विट केला असून तिचे नाव अन्विता असे आहे.

तसेच प्रेयसीच्या होकारानंतर प्रियकर सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना “हाऊज द जोश” असे विचारतो.

तेव्हा प्रेक्षकही मोठ्याने “येस सर” असे म्हणताना दिसतात.

अशाप्रकारे एकीकडे भारताने पाकवर विजय मिळवला

तर दुसरीकडे या प्रियकराने आपल्या प्रियसीचा होकार मिऴवला

त्यामुळे क्रिकेटविश्वात या मजेदार प्रेमकहानीचीही चांगलीच चर्चा रंगतेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *