Sun. Jun 20th, 2021

शारीरिक संबंधांची जबरदस्ती करून नग्न फोटो केले viral; नराधमाला अटक!

जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत पिडीतीचे नग्न फोटो आणि व्हिडीओ काढल्याप्रकरणी नराधम तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवडमधील ही घटना 2016 पासून हा नराधम तिच्यावर दबाव आणायचा  अत्याचार करत होता.

नराधमाकडून अल्पवयीन मुलीचा छळ!

चिखली येथील पीडिता आणि नराधम तरुण हे शेजारीच राहतात.

अल्पवयीन पीडिता दहावीत असल्यापासून तो तिच्या मागावर होता.

बऱ्याचदा रस्त्यात अडवण्यापर्यंत त्याची मजल पोहचली होती.

त्याने तिला मैत्रीच्या जाळ्यातही ओढलं.

एके दिवशी त्याने पीडितेला फिरायला नेलं आणि तिथं जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केले.

तिची नजर चुकवून तिचे नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडिओ देखील काढले.

घडला प्रकार तिने कुटुंबियांना सांगितला.

ते कळताच नराधमाणे पीडिताच्या आई, वडील आणि बहिणीला जीवे मारण्याची धमकी दिली.

नंतर प्रकरणावर पडदा टाकला गेला, पण अलीकडच्या काळात त्याने ‘ते’ फोटो आणि व्हिडीओ पीडिताच्या मोबाईलवर पाठवला आणि शरीर सुखाची मागणी केली.

त्यामुळे कुटुंबियाला मोठा धक्का बसला.

पण पिडीतीने मात्र हे झुगारून त्यास नकार दिला.

मग नराधमाने थेट पीडिताच्या मावस भावालाच ‘ते’ फोटो आणि व्हिडिओ पाठवले, यामुळे हादरलेल्या कुटुंबीयांनी थेट चिखली पोलीस स्टेशन गाठलं आणि नराधमाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *