Tue. Aug 20th, 2019

‘तो’ खायचा लोखंडी वस्तू; पोटातून काढले 116 खिळे

0Shares

राजस्थानमध्ये एका रुगणाच्या पोटातून चक्क लोखंडाचे खिळे, तारा आणि काडतूसं सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोटात दुखत असल्यामुळे रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोटात 116 खिळे असल्याचे डॉक्टरांना आढळले. डॉक्टरांनी त्वरीत यशस्वीरित्या रुग्णाच्या पोटातून ऑपरेशनकरून काढून टाकण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं ?

राजस्थानमध्ये एका रुग्णाच्या पोटातून 116 लोखंडाचे खिळे, तारा आढळल्या आहेत.

भोला शंकर असे या रुग्णाचे नाव आहे.

भोला शंकरच्या पोटात दुखत असल्यामुळे त्याला बुंदी जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र एक्स-रे आणि सिटी स्कॅन केल्यानंतर पोटात खिळे असल्याचे डॉक्टरांना समजले.

डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास सांगितले.

तब्बल दीड तास ऑपरेशन केल्यानंतर भोलाच्या पोटातून लोखंडी वस्तू काढण्यास यश मिळाले.

भोलाच्या पोटात एक खिळा ६.५ इंच लांब असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मात्र या लोखंडी वस्तून पोटात गेल्याच कशा ? असा प्रश्न डॉक्टरांना उपस्थित झाला.

भोलाच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे भोलाची मानसिक स्थिती बिघडल्यामुळे त्यानेच या लोखंडी वस्तू खाल्या असल्याचे डॉक्टरांनी म्हटलं आहे.

 

 

 

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *