Mon. Aug 15th, 2022

राज ठाकरे यांच्या सभेतील भाषणाकडे सर्वांचं लक्ष

‘सत्तेत असूनही औरंगाबादचे संभाजीनगर का नाही?’ असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादच्या सभेत विचारतील अशी खात्रीलायक सुत्रांची माहिती आहे. राज यांच्या निशाण्यावर शिवसेना असेल असेही मनसेच्या गोटातून समजते आहे. यामुळेच, औरंगाबादेतल्या सभेत राज ठाकरे काय बोलतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहिर सभा होणार आहे. सर्व महाराष्ट्राचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे लागले आहे. मशिदीवरील भोंग्यासंदर्भात राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. औरंगाबादेतल्या सभेत एमआयएम देखील त्याच्या निशाण्यावर असेल अशी शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.