Sat. May 15th, 2021

शिवीगाळ करणाऱ्या युझरवर भडकली मानसी नाईक

मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकचे काही महिन्यांपूर्वीच बॉक्सर प्रदीप खरेरासोबत लग्नगाठ बांधली तसेच अनेकदा मानसी ही तिच्या पती बरोबर फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर शेअर करत असते. मराठी चित्रपटसृष्टीत मानसीने खूप नाव कमावले आहे. काही दिवसांपूर्वी मानसीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. परंतु, आपल्यावर झालेली शिवीगाळ सहन न झाल्यानं तिने एका लाइव्ह सेशन दरम्यान युझरच्या कमेंटला त्याच्याच शब्दात उत्तर दिलं.

मानसीने नुकताच एका लाइव्ह सेशनमध्ये भाग घेतला होता. त्यात एका युझरने मानसीच्या पोस्टवर केलेल्या घाणेरड्या कमेंटला उत्तर देताना ती म्हणाली, ‘तुम्ही मला बुधवार पेठेत कधी बघितलं? आणि तुम्ही तिथे काय करत होतात? बुधवार पेठ ही जागा ज्या स्त्रिया चालवतात त्या स्वतःच्या पोटापाण्यासाठी ते काम करतात. त्या त्यांच्या हिंमतीवर जगतात. प्रामाणिकपणे काम करतात. त्या स्त्रिया तिथे का आल्या असं तुम्हाला वाटत? तुमच्यात हिंमत असेल तर तुम्हीही काम करून खा. पण दुसऱ्यांना अशा भाषेत शिव्या घालून काय मिळतं?’ असं अनेक प्रश्न विचारत तिने त्या युझरला सुनावलं आहे. कलाकारांच्या काही गोष्टी आवडत नाहीत म्हणून त्यांच्यावर शिवीगाळ करणं हे चुकीचं आहे, असं मानसीने म्हटलं. मानसीला तिच्या लग्नावरुनही अनेक जणांनी ट्रोल केलं होतं. तुला मराठी मुलगा भेटला नाही का? असं तिला विचारण्यात आलं होतं. हिंदी , मराठी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेता आणि अभिनेत्रीना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *