Jaimaharashtra news

मन्चुरियन मिसळ आणि मेक्सिकन मिसळ होतेय लोकप्रिय!

वडापाव, पावभाजी यांसारख्या महाराष्ट्र, मुंबई येथील लोकांच्या फेव्हरेट खाद्यपदार्थांच्या यादीत एक नाव आवर्जून घ्यावं लागतं. ते म्हणजे मिसळीचं. झणझणीत मिसळ न आवडणारा खवय्या विरळाच. गावोगावची मिसळ फेमस असते. पुणेरी मिसळ, कोल्हापूरी मिसळ, नाशिकची मिसळ या मिसळींचा तर खास चाहता वर्ग आहे आणि कोणती मिसळ जास्त चांगली, यावर ते वाददेखील घालतात.

कडधान्य, फरसाण आणि त्यावर झणझणीत लाल रस्सा… त्याला तर्री, कट किंवा सँपल म्हटलं जातं. आत्तापर्यंत झणझणीत मिसळ किंवा दही मिसळ तुम्ही खाल्ली असेल. उपवासाची फराळी मिसळ खाल्ली असेल. पण आता पारंपरिक मिसळीला फ्युजनचा तडका मिळालाय. पाणीपुरी मिसळ आणि शेजवान मिसळ यांच्यानंतर आता चायनिज मन्चुरियन मिसळ आणि मेक्सिकन पेरी पेरी मिसळ यांची भर पडली आहे.

मन्चुरियन मिसळीमध्ये मन्चुरियन बॉल्स टाकलेले असतात. त्यामुळे चायनिज मन्चुरियनची चवही मिसळीला असते.

ही मिसळ सध्या लोकप्रिय होत आहे.

चायनिज मिसळीप्रमाणे मेक्सिकन मिसळही सध्या खवय्यांच्या आकर्षणाचा विषय बनली आहे.

या मिसळीचं वैशिष्ट्य म्हणजे मिसळीत फरसाणसोबत नाचोज यात असतात. तसंच पेरीपेरीची टेस्टही त्याला असते.

 

Exit mobile version