Wed. Jun 19th, 2019

मंदार कमलापूरकर यांना ‘सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजना’चा पुरस्कार!

0Shares

राज्य सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 56 व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मंदार कमलापूरकर यांना ‘पुष्पक विमान’ सिनेमासाठी ‘सर्वोत्कृष्ट ध्वनीसंयोजना’च्या पुरस्काराने गौरवण्यात आलंय. मंदार यांना यापूर्वी 2017 साली ध्वनीसंयोजनासाठी झी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलंय.

कोण आहेत मंदार कमलापूरकर?  

मंदार कमलापूरकर यांनी B.E. केल्यानंतर Film & Television Institute of India (FTII) मधून ऑडिओग्राफीमध्ये पोस्ट ग्रँज्युएट डिप्लोमा केला.

ते सध्या मुंबईमध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये साऊंड डिझायनर म्हणून कार्यरत आहेत.

त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांसाठी ध्वनीसंयोजनाचं काम केलं आहे. तसंच अनेक शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरीज आणि जहिरातींसाठीही त्यांनी काम केलंय.

ध्वनीसंयोजनाबरोबरच मंदार यांनी स्वतः तीन डॉक्युमेंटरीजचं दिग्दर्शनही केलं आहे. भारत सरकारच्या डॉक्युमेंटरीजचंही त्यांनी दिग्दर्शन केलंय.

गेल्यावर्षी रिलिज झालेला आणि भारतीय सिनेसृष्टीत आता ‘कल्ट’ स्टेटस प्राप्त झालेला सिनेमा ‘तुम्बाड’साठीही मंदार कमलापूरकर यांनी ध्वनी संयोजन केलं होतं. याशिवाय ‘मॉम’, ‘बॉबी जासूस’, ‘आकाश बानी’, ‘दिल जो न कह सका’, ‘हलका’, ‘राखोश’, ‘वेटिंग’ या सिनेमांचं ध्वनीसंयोजन त्यांनी केलंय.

‘पुष्पक विमान’, ‘किल्ला’, ‘उबुंटू नदी वाहते’, ‘डोंबिवली रिटर्न’ यांसारख्या अनेक मराठी सिनेमांचंही त्यांनी Sound Design केलंय. ‘उंबुटू’ सिनेमासाठी झी गौरवचा सर्वोत्कृष्ट ध्वनीसंयोजनाचा पुरस्कारही मिळालाय.

सध्या चर्चेत असणाऱ्या ‘माईंड द मल्होत्राज’ या वेबसीरिजचं ध्वनीसंयोजनही कमलापूरकर यांनी केलंय.

पॅम्फलेट या शॉर्ट फिल्मसाठीही IFFI मध्ये  सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजनाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: