Mon. Jan 17th, 2022

मंदिरा बेदीच्या घरात नवीन पाहुण्यांचं आगमन

मंदिराने चार वर्षांच्या मुलीला दत्तक घेतले…

अभिनेत्री मंदिरा बेदी वयाच्या ४८व्या वर्षीही हॉट आणि ग्लॅमरस दिसते. मंदिरा बेदी ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते. नुकताच तिने एक फोटो शेयर केला आहे ज्यात ती एका छोट्या मुलीसोबत दिसत आहे. 

मंदिराने एका चार वर्षांच्या मुलीला दत्तक घेतले आहे. याबाबतची माहिती मंदिराने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. मंदिराने दत्तक घेतलेल्या मुलीसोबतचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

हा फोटो शेअर करत तिने लिहलंं, ‘ही माझी छोटी मुलगी तारा. चार वर्षांपेक्षा थोडी मोठी. तिच्या डोळ्यात ताऱ्यांप्रमाणे चमक आहे. वीरची लहान बहिण. तिचे नाव तारा बेदी कौशल आहे. २८ जुलै २०२०पासून आमच्या कुटुंबाचा भाग झाली आहे’ या आशयाचे कॅप्शन दिलं आहे.

मंदिराने शेअर केलेल्या फोटोत ती तिचा मुलगा, पती आणि छोटी मुलगी हे पांढऱ्या रंगाचे कपड्यात दिसत आहे. नेटकऱ्यानी मंदिराच्या ह्या पोस्टवर कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. मंदिराला ९ वर्षीय मुलगा आहे मात्र तिला नेहमीच एका मुलीला दत्तक घेण्याची इच्छा होती असं तिने एका मुलाखती दरम्यान सांगितलं होतं. गेल्या दोन-तिन वर्षांपासून मुलीला दत्तक घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं मंदिराने सांगितले होतं. २८ जुलै २०२० मध्ये मंदिराची ही इच्छा पूर्ण झाल्यावर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून तिने आनंद व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *