Wed. Jun 26th, 2019

‘अवनी’ वाघिणीची हत्या, मनेका गांधी संतापल्या

0Shares

यवतमाळमध्ये ‘अवनी’ वाघिणीची हत्या झाल्याचा आरोप करत प्राणीप्रेमींचा निषेध व्यक्त होत असतानाच, या वाघिणीला ठार मारण्याचे आदेश देणाऱ्या महाराष्ट्रातील फडणवीस सरकारवर केंद्रीय मंत्री आणि वन्यजीवप्रेमी मनेका गांधी चांगल्याच संतापल्या आहेत.

अवनीच्या हत्येने दुःख झालं असून हे प्रकरण आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर #Justice4TigressAvni या हॅशटॅगने मनेका गांधी यांनी ट्विट केले आहे. अवनीच्या मृत्युने दुःख झालं. अवनी वाघिणीची निर्घृणपणे हत्याच केली आहे. हा एक प्रकारचा गुन्हाच आहे.

अनेक लोकांनी विनंत्या करूनही महाराष्ट्राचे मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी अवनी वाघिणीला ठार करण्याचे आदेश दिले, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटंले आहे. आतापर्यंत 3 वाघ, बिबटे आणि रानडुकरांना ठार मारलं आहे. वन्यप्राण्यांच्या हत्येसाठी प्रत्येक वेळी हैदराबादचे शूटर शाफत अली खान यांनाच बोलावले जातं मात्र यावेळी अवनी वाघिणीला ठार मारण्यासाठी त्यांच्या मुलाला पाचारण करण्यात आलं, असंही त्यांनी म्हणाल्या आहेत. मनेका गांधी यांनी म्हटंल आहे, की ‘शाफत अली खान यांनी चंद्रपूरमध्ये 3 वाघ, 10 बिबटे, हत्ती आणि 300 रानडुकरांची हत्या केली आहे. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी सर्वांच माहिती आहे. असही त्या म्हणाल्या आहे

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: