Mon. Aug 15th, 2022

अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान

राज्यभरात ऐन उन्हाळाच्या दिवसांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील कोकण, विदर्भासह अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ऐन आंब्याच्या हंगामात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्यामुळे कोकणातील आंबा बागायतदार चिंतेत असून शेतीमालाच्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

कोकणात अवकाळी पवसाच्या सरींमुळे आंबा बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार कोकणातील सावर्डे येथील स्वर्गीय गोविंदराव निकम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी आले होते. या कार्यक्रमात नुकसानीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारले गेले होते. मात्र, या प्रश्नांवर अजित पवार यांनी मौन बाळगल्यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत.
कमी उत्पादन त्यात अवकाळी पावसाची हजेरी यामुळे कोकणातील आंबा बागायतदार मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे यंदा बागायतदारांची वर्षभराची आर्थिक गणिते आंबा, काजू या पिकांवर अवलंबून असतात त्याच पिकांचे नुकसान झाल्याने कोकणातील शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं झालं आहे.

दरम्यान, पावसामुळे खराब झालेले आंबे आणि उत्पदनाची कमतरता यामुळे बाजारात आंबा अधिक महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.