जखमी मदतीची याचना करत होते, ते आंबे लुटत होते; 15 मिनिटातचं तब्बल 3 लाखांचा आंबा गायब

जय महाराष्ट्र न्यूज, संगमनेर

 

नाशिक-पुणे महामार्गावर माणुसकी शुन्य समोर आली आहे. महामार्गावर रत्नागिरी हापूस घेऊन जाणाऱ्या गाडीचा अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी जखमींना मदत करण्याऐवजी आंब्याच्या

पेट्या पळवण्यात धन्यता मानली.

 

अपघातात जखमी मदतीसाठी याचना करत होते, मात्र त्यांना मदत करण्याचं सोडून जास्तीत जास्त आंबे कसे पळवण्याचा ज्याचा-त्याचा प्रयत्न सुरू होता.

 

11 तारखेची ही घटना आहे. रत्नागिरीहून नाशिकला हापूस आंबे घेऊन जात असतांना नगर जिल्हयातील बोट्याजवळ अपघात हून पिकअप गाडी उलटली. 

 

त्यामुळे गाडीतील आंब्याच्या पेट्या बाहेर फेकल्या गेल्या. हापूस आंबा दिसल्यानंतर माणुसकी विसरून स्थानिक लोक आंबे गोळा करण्यात मग्न होते.

 

या अपघातानंतर अवघ्या 15 मिनिटातचं तब्बल 3 लाखांचा आंबा गायब झाला.

Exit mobile version