Jaimaharashtra news

माणिकराव कोकाटे यांना एसीबीकडून नोटीस

लोकसभा निवडणुका दोन दिवसांवरच असताना भाजपाचे बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना एसीबीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याने त्यांच्यावर चौकशी होत असल्याची माहिती समोर आली आहे. निवडणुकींच्या काळात त्यांची चौकशी होत असल्यामुळे खळबळ उडाली आहे. माणिकराव कोकाटे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

ऐन निवडणुकींच्या काळात भाजपाचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटे यांना एसीबीकडून नोटीस बजवण्यात आली आहे.

तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने कोकाटेंनी बंडखोरी केली असल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र माणिकराव कोकाटे यांना नाशिक लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.

उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याने कोकाटेंची चौकशी सुरू असल्याचे समजते आहे.

 

 

 

Exit mobile version