Mon. Aug 15th, 2022

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्षपदी मनीष दळवी, उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी सरकार पराभूत झाली असून अध्यक्षपदी भाजपाचे मनीष दळवी यांची निवड झाली आहे तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर विजयी झाले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे अभिनंदन केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेवर भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. महाविकास आघाडीच्या अध्यक्षपदासाठी विक्टर डांटस यांनी आणि सुशांत नाईक यांनी उपाध्यपदासाठी अर्ज केला होता. मात्र भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा ११-८ असा पराभव केला आहे. भाजपाने ११ जागा जिंकत सिंधुदुर्ग बँकेवर वर्चस्व कायम ठेवलं असून मविआने ८ जागांवर यश मिळवले आहे.

संतोष परब हल्ल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीकडे सर्व राज्यभराचे लक्ष लागले होते. तर याप्रकरणी मनीष दळवी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली असून मनीष दळवी आणि अतुल काळसेकर यांनी मविआ नेत्यांचा पराभव केला आहे.

1 thought on “सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्षपदी मनीष दळवी, उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर

  1. Its actually a great post. I am sure that anyone would like to visit it again and again. After reading this post I got some very unique information which are in actuality very helpful for anyone. This is a post experiencing some crucial information. I wish that in future such posting should go on.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.