Fri. Jun 21st, 2019

ब्रम्हपुत्रा साहित्यिक कार्यक्रमाला मनिषा कोईराला उपस्थित

0Shares

आसाम सरकारने गुवाहाटी तीन दिवसीय ब्रम्हपुत्रा साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ब्रम्हपुत्रा साहित्यिक कार्यक्रमाला शनिवारपासून सुरूवात झाली असून गेल्या तीन वर्षापासून हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमाला अभिनेत्री मनिषा कोईराला यांनी उपस्थित लावली असून त्यांना सन्मानितही करण्यात आले. यावेळी त्यांनी कर्करोगावर लढा कसा मिळवला याबद्दलही सांगितले. अभिनेत्री मनिषा कोईराला यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. ‘मला या कार्यक्रमासाठी आमंत्रीत केल्याबद्दल आसाम सरकारचे आभार मानते. तसेच मला सन्मानित केल्याबद्दलही धन्यवाद’, असे अभिनेत्री मनिषा कोईराला यांनी म्हटलं आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: