Sun. Sep 19th, 2021

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची ‘एसपीजी’ सुरक्षा काढली; ‘झेड प्लस’ सुरक्षा मिळणार

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची ‘एसपीजी’ सुरक्षा काढत असल्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहे. मात्र आतापासून मनमोहन सिंह यांना ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा मिळणार असल्याचे गृह मंत्रालयाने म्हटलं आहे. मनमोहन सिंग यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय वैयक्तिक नसल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

काय आहे गृहमंत्रालयाचा निर्णय ?

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना एसपीजी सुरक्षा काढून झेड प्लस सुरक्षा मिळणार असल्याचे गृह मंत्रालयाने सांगितले आहे.

तसेच मनमोहन सिंग यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय वैयक्तिक नसल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

काही काळानंतर सुरक्षा व्यवस्था कवर रिव्यू करत असल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे.

ही सामान्य प्रक्रिया असल्यामुळे सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

एका व्यक्तीला असणाऱ्या धोक्याच्या आधारवर सुरक्षा व्यवस्था बदलण्यात येत असल्याचे म्हटलं जात आहे.

यापूर्वीही अनेक माजी पंतप्रधानांची ही सुरक्षा काही काळानंतर काढण्यात आली होती असे समोर आले आहे.

त्याचबरोबर एसपीजी ही सुरक्षा व्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींसह कॉंग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांना मिळत आहे.

मात्र सरकारच्या या निर्णयावरून वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *