Jaimaharashtra news

केरळ जलप्रलयाबाबत मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून भावना व्यक्त…

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

‘मन की बात’ कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी देशवासीयांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आणि नंतर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी श्रद्धांजली वाहिली.

काल ओणम सणाचे पर्व सुरू झाले. जलप्रलयाच्या संकटातून केरळ लवकर बाहेर येवो आणि केरळच्या विकासाच्या यात्रेला अधिक गती मिळो. 

केरळमध्ये आलेल्या जलप्रयलामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या कठिण प्रसंगी संपूर्ण देश केरळसोबत आहे. पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांप्रती शोकदेखील व्यक्त करण्यात आला.  

 

 

Exit mobile version