Sun. Jan 16th, 2022

भाजपाकडून ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी

आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय हालचालींना वेग आला आहे. ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज भाजपाने ईशान्य मुंबईच्या उमेदवाराची घोषणा केली. यावेळी विद्यामान खासदार किरीट सोमय्या यांना डावलून मनोज कोटक यांना देण्यात आली आहे. भाजपाच्या या निर्णयाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

ईशान्य मुंबईतून मनोज कोटक –

अनेक दिवसांपासून ईशान्य मुंबईतील उमेदवाराची चर्चा केली जात होती.

मात्र आज भाजपाने उमेदवाराची घोषणा केली आहे.

ईशान्य मुंबईतून भाजपाकडून मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मनोज कोटक हे मुंबई महापालिकेचे भाजपाचे गटनेते असल्याचे म्हटलं जात आहे.

तसेच विद्यामान खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज असल्याचे समजते आहे.

किरीट सोमय्या यांच्या नावावर शिवसैनिकांचा विरोध असल्याचे कारण सांगण्यात येत आहे.

यापूर्वी किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अनेक वादग्रस्त वक्तव्य केले.

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी अनेक प्रयत्नही केले.

त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसैनिक नाराज झाले होते.

त्यामुळे किरीट सोमय्या यांनी मातोश्री वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

मात्र किरीट सोमय्या यांना भेटण्यापासून नकार दिल्याचे म्हटलं जात आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *