महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर तर येत्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस

भारताच्या पूर्वमध्य व दक्षिण पूर्व अरबी समुद्रात ‘वायू’ चक्रीवादळ तयार झाले आहे. या वादळामुळे दोन दिवस महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावर वाऱ्याचा वेग वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण व गोव्यातील काही भागात वादळासह मुसळधार पावसाची शक्यता मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. ‘ वायू ‘ चक्रीवादळ मुंबई बसण्याची शक्यता आहे.मुंबईसह कोकणात पण सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच येत्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वायू चक्रीवादळ गुजरातला धडकणार
येत्या 24 तासांत वायू चक्रीवादळ गुजरातला धडकणार हवामान खात्याचा अंदाज आहे.
चक्रीवादळाचा ताशी 140 ते 150 किलोमीटर वेगाने वायू चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकत आहे.
मुंबईसह कोकण किनारपट्टीला धोका नाही. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर वेगानं वारे वाहू लागणार आहे.
प्रशासनाकडून पुढील 48 तासांत मच्छिमारांसह नागरिकांना समुद्र किनाऱ्यावर न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
खबरदारीसाठी एनडीआरएफची पथक तैनात करण्यात आला आहे. वायू चक्रीवादळसाठी गुजरात प्रशासनही सज्ज आहे.
गुजरातमधील काही भागांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून पोरबंदर जिल्ह्यातील 74 गावांमधील 35 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं
महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर
राज्यात यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
मॉन्सूनचे आगमन केरळ च्या भागात झाले असले तरी त्याची पुढची वाटचाल हळू राहणार आहे.
यामुळे महाराष्ट्रात जून च्या दुसऱ्या आठवड्या पर्यंत तरी मान्सूनच्या आगमनाची शक्यता कमी आहे.
राज्यात किमान 16 जूनपर्यंत तरी मान्सून-पूर्वीच्या पावसाची शक्यता नाही.