मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा मृतदेह मुंब्रा येथे सापडला

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकानंतर आता नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे. या मृतकाचे नाव मनसुख हिरेन असून याचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला आहे. गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजरही झाले होते. याप्रकरणी मनसुख यांनी गाडी चोरी गेली असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं शिवाय या प्रकरणावर क्राईम ब्रँचनी चौकशी केली होती. मुकेश अंबानीच्या अँटेलिया बंगल्याजवळ 25 फेब्रुवारीला संशयित स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळल्यानं चांगलीचं खळबळ उडाली होती.

मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आल्यानं तपास यंत्रणा अलर्ट झाल्या होत्या. यानंतर कडक बंदोबस्त हा अंबानी यांच्या घराजवळ केला होता. 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 1 वाजता अंबानी यांच्या घराजवळ ही कार ठेवण्यात आली होती. आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी ही कार पोलिसांच्या निदर्शास आल्यानंतर घटनेचा तपास क्राईम ब्रांचच्या सीआययु युनिट कडे देण्यात आला होता. मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानं याप्रकरणात आणखी गुंता वाढला आहे. मनसुख हिरेन यांचा खून केला गेला की आत्महत्या याचा तपास अजून सुरु आहे.

Exit mobile version