Sun. Oct 17th, 2021

‘या’ नेत्यांनी वाहिली महात्मा गांधीजींना श्रद्धांजली

राष्ट्रपिता महात्मा गांधींची आज 72 वी पुण्यतिथी. 30जानेवारी 1948 साली दिल्लीच्या बिर्ला हाऊस मध्ये गांधीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी निमित्ताने अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली.

महात्मा गांधीजींचे विचार, आदर्श आपल्याला सशक्त सक्षण आणि नव भारताच्या निर्माणासाठी नेहमची प्ररित करत राहतील, अशी भावना मोदींनी आपल्या ट्विटमधून व्यक्त केली आहे.

तसेच राष्ट्रपती रामदास कोविंद यांनी ट्विद्वारे आदरांजली वाहिली आहे.

तसेच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आपल्या लहानपणीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘बापू तुम जिंदा हो खेतों में खलिहानों में न्याय, सत्य और प्रेम के अरमानों में’ अशी कॅप्शन या व्हिडिओला दिली आहे.

यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी महात्मा गांधींना श्रद्धांजली अपर्ण केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *