Thu. May 6th, 2021

सर्वोच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार सुनावणी

कोरोनामुळे देशाची परिस्थित बिकट झाली आहे. देशात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा दररोज हजारांनी वाढत आहे. शिवाय यातच आता सर्वोच्च न्यायालयामध्येही कित्येक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयातील सुनावण्या काही काळाने पुढे ढकलल्या आहेत. मात्र काही सुनावण्या या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार असल्याचं माहिती मिळाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायाधीश हे आपल्या घरातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीस हजर राहणार आहेत. शिवाय १०.३०ला ज्या खंडपीठांमध्ये सुनावणी पार पडणार होती, त्याठिकाणी आता ११.३०ला सुनावणी पार पडेल. तसेच ११ वाजता सुरू होणाऱ्या सुनावण्या, १२ वाजता सुरू होतील. देशात कोरोनाची दुसरी लाट आली आल्यानं देशाची परिस्थिती ही गंभीर झाली आहे्. दिवसेंदिवस अधिकाधिक रुग्ण आढळून आल्यानं देशात पुन्हा एकदा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच सर्वोच्च न्यायालयामध्येही कित्येक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावण्या होणार असा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *