Sat. Jul 31st, 2021

छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षली हल्ला, 4 जणांचा मृत्यू

छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला उडवलं असून या नक्षलवादी हल्ल्यात सुरक्षा दलातील 1 जवान शहीद झाला आहे. तर या हल्ल्यात 3 नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.

गुरुवारी सकाळी दंतेवाड्यातील बचेली येथे नक्षलवाद्यांनी सीआयएसएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला उडवलं. नक्षलवाद्यांनी बसच्या मार्गावर घडवलेल्या स्फोटात 1 जवान शहीद झाला तर या हल्ल्यात 3 नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची वर्तवली जात आहे.

दंतेवाड्यात गेल्या 10 दिवसांत सुरक्षा दलांवर हा दुसरा नक्षली हल्ला आहे. यापूर्वीही ३० ऑक्टोबर रोजी दंतेवाड्यात नक्षलींनी सुरक्षा दलांवर केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) 2 जवान शहीद झाले होते. तर दूरदर्शनच्या एका कॅमेरामनचाही मृत्यू झाला होता. या चकमकीत 2 नक्षलवाद्यांनाही ठार करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *