Sun. Jan 16th, 2022

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी 7 दिवसाची मुदतवाढ

मराठा वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आजही आंदोलन सुरू आहे. राज्यसरकारने वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी सात दिवसाची मुदत वाढवू असे आश्वासन देऊनही नोटिफेकेशन अजून देलेते नाही. मुख्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेवून त्यांनी 7 दिवसाची मुदत दिली होती. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं आहे. आज वैद्यकीय महाविद्यालय शाखांची निवड करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. राज्यसरकार उदासीन असल्याचं आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसचं मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांकडून राज्य सरकारला एक तासाचा अल्टीमेटम  देण्यात आला आहे. यामुळे वैद्यकीय प्रवेशाची सात दिवसाची मुदत वाढवण्यासाठी सरकारने परिपत्रक काढले आहे.

मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांकडून आंदोलनाचा इशारा

राज्यसरकारने वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी सात दिवसाची मुदत वाढवू असे आश्वासन देऊनही नोटिफेकेशन अजून देल गेलं नाही.

आज तीन वाजे पर्यंत प्रेफ्रन्स फॉर्म भरण्याची वेळ आहे. आणि अजूनही नोटिफेकेशन दिलं गेल नाही.

मुळे राज्यसरकार आमच्या प्रश्नाबाबत उदासीन असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनकडून केला जात आहे.

तसेच सरकार मराठा समाजातील विद्यार्थ्यांची फसवणूक करतेय का? असा प्रश्न मराठा क्रांती मोर्चाचे समनव्यक विचारात आहे.

अजून एका तासात सरकारने नोटिफेकेशन काढले नाही तर सर्व मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आंदोलन करतील असा इशारा दिला आहे.

या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

सरकारचे  परिपत्रक

वैद्यकीय प्रवेशाची सात दिवसाची मुदत वाढवण्याची सरकारने परिपत्रक  काढले आहे.

परिपत्रकात प्रवेश प्रक्रियसाठी सात दिवस वाढवण्यात आल्याची माहिती दिली आहे.

शासनाच्या वेब साईट वर सरकारने परिपत्रक काढलं आहे. मात्र विद्यार्थ्यांत संभ्रमाच वातावरण आहे.

परिपत्रकात स्पष्टपणे माहिती दिली नाही असा आरोप दिल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *