मराठा आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका मांडा- मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मराठा आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका मांडा, असे आदेश मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिले आहेत.
मराठा आरक्षणाचा मुद्दा मागासवर्गीय आयोगाकडे सुपूर्द करावा की नाही, याबाबत राज्य सरकारनं आपलं मत स्पष्ट करावं.
4 मेपर्यंत सरकारनं आपलं प्रतिज्ञापत्र द्यावं, असे निर्देश कोर्टानं दिले आहेत. याप्रकरणी आता 4 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे.