Wed. Jun 26th, 2019

मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारने दिलं प्रतिज्ञापत्र

0Shares

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्याच्या मागासप्रवर्ग समीतीकडे सोपवण्यास हरकत नाही, असं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात सादर केलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 एप्रिल रोजी होईल. 

 

नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या मागासवर्गीय आयोगाकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा सोपवावा, अशा अनेक याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाल्या आहेत. या याचिकेवर हायकोर्टाने सरकारला आणि याचिकाकर्त्यांना आपली भूमिका मांडण्यास सांगितलं होतं. 

 

यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्याच्या मागासप्रवर्ग समीतीकडे सोपवण्यास हरकत नाही, असं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात स्पष्टीकरण देताना राज्य सरकारच्या वतीने सादर करण्यात आलं. त्यामुळे 27 एप्रिल रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत काय होईल, याकडे लक्ष लागलं आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: