Tue. Oct 26th, 2021

मराठा क्रांती मोर्चातर्फे 288 जागांवर उभे केले जाणार उमेदवार!

मराठा क्रांती मोर्चा आता निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय. विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

काय म्हणाले आबासाहेब पाटील?

मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांचा राज्य सरकारला विसर पडलाय.

आरक्षण मिळालं असलं, तरी मराठा समाजाच्या अनेक मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत.

विद्यार्थ्यांना अजूनही त्रास सहन करावा लागतोय.

प्रवेश प्रक्रिया अजूनही सुलभ झालेली नाही.

केंद्रात आणि राज्यात मराठा लोकप्रतिनिधी मराठा समाजाच्या मागण्यांचा योग्य पद्धतीने पाठपुरावा करत नाहीत.

त्यामुळेच 30 वर्षांपेक्षा जास्त काळापासून मराठा समाजाचा केवळ राजकीय फायद्यासाठी वापर केला जातोय.

सरकार आणि विरोधक एकाच माळेचे मणी आहेत.

म्हणूनच एक सशक्त पर्याय म्हणून मराठा क्रांती मोर्चातर्फे निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *