Jaimaharashtra news

‘अशोक चव्हाण यांनी तात्काळ राजीनामा द्यावा’

मराठा समाजासाठी आज दिवस काळा दिवस असून याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचं आमदार विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.

तसेच अशोक चव्हाण यांनी तात्काळ राजीनामा द्यावा,अशी मागणीही आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. ‘मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी राज्य सरकारकडून व्यवस्थित पाठपुरावा झाला नाही. वकील हजर करता आले नाही’ असा आरोपदेखील विनायक मेटे यांनी केला.

‘राज्य सरकारकडून व्यवस्थित पाठपुरावा न झाल्यानेच मराठा आरक्षणाचा प्रश्न कोर्टामध्ये टिकू शकला नाही. याला सर्वस्वी जबाबदार महाविकास आघाडीचे सरकार आहे’, असा टोलादेखील त्यांनी लगावला. तसेच यापुढे आघाडीसरकारला दाखवून देण्यासाठी नियम पाळून आंदोलन करा, असे आवाहन देखील मेटे यांनी केले.

 

 

Exit mobile version