Mon. Dec 6th, 2021

मराठा आरक्षण वैध, मात्र 16% आरक्षणाला हायकोर्टाचा नकार!

राज्य़ सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार असल्याचं, मुंबई हायकोर्टाने स्पष्ट करत मराठा आरक्षण सुरूच राहील असा निकाल देण्यात आला आहे. मात्र 16% आरक्षणाला कोर्टाने नकार देत मराठा समाजाला 12 ते 13% आरक्षण देता येईल, असा निर्णय हायकोर्टाने दिलाय. शिक्षणात आरक्षण 12% तर शासकीय नोकऱ्यांमध्ये 13% आरक्षण देण्याचे मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत.

मराठा आरक्षण प्रकरणी हायकोर्टाचा काय निकाल येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. कोर्टात 16% आरक्षण टिकणार की नाही, याबद्दल सर्वांनाच उत्कंठा होती. अखेर यावर हायकोर्टाने आपला निर्णय जाहीर केला आहे. मराठा समाज आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागसला असल्याचं मान्य करत या क्षेत्रात मराठा आरक्षण देण्याच्या निर्णयाला कोर्टाने मान्यता दिली आहे. मात्र आरक्षणाची टक्केवारी 16 टक्क्यांवरून 12 ते 13 %  करावी, अशी सूचना सरकारला हायकोर्टाने दिली आहे. शिक्षणात 12% आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये 13% आरक्षण देण्याचे निर्देश सरकारला देण्यातच आले आहेत.

सरकारने नोव्हेंबर 2018मध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण जाहीर केलं.

या आरक्षणाच्या समर्थनार्थ 2 आणि विरोधात 4 याचिका दाखल करण्यात आल्या.

22 हस्तक्षेप अर्ज दाखल झाले.

त्यातील 6 अर्ज या आरक्षणाच्या विरोधात होते.

अखेर हायकोर्टाने मराठा आरक्षणाला मान्यता दिली आहे. मात्र 16 टक्के आरक्षणाला नकार दिला असून 12 ते 143 टक्के आरक्षण देण्याच्या सूचना केल्या आहेत.

मराठा आरक्षण घटनाक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *