Sat. Sep 21st, 2019

फोटोशूटच्या नावाखाली तरुणीचा विनयभंग, प्रसिद्ध मराठी अभिनेता अटक

0Shares

अभिनयात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणीचा पुण्यात एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंदार कुलकर्णी या अभिनेत्याला अटक केलं आहे. फोटोशूटच्या बहाण्याने तरुणीला घरी बोलावून तिचा विनयभंग केल्याची तक्रार करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येतंय.

काय घडलं नेमकं फोटोशूटच्या वेळी ?

अभिनय शिबिरात पीडित तरुणीची आरोपीशी ओळख झाली होती.

आपण तुझी टीव्ही सिरीयस, सिनेमासाठी शिफारस करू असं सांगत त्यासाठी घरीच फोटोशूट आणि ऑडिशनला बोलावून घेतलं.

16 ऑगस्टला आरोपीच्या घरी फोटोशूटच्या वेळी तिला बिकिनी घालायला दिली.

सुरुवातीला तरुणी यासाठी तयार नव्हती. मात्र आरोपीने पुष्कळ आग्रह केल्यावर तिने बिकिनी परिधान केली.

आरोपीने तिच्या उघड्या पाठीचे फोटो मोबाईल कॅमेऱ्याने काढले.

त्यानंतर कपड्यांचं माप घेण्याचा बहाणा करत तिला अंगावरील कपडे काढायला लावले आणि विनयभंग केला.

तसंच तू अशा प्रकारचं फोटोशूट केलं आहेस, हे घरी सांगू नकोस, असंही आरोपीने धमकावलं.

यासंदर्भात तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोस्कोअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी मंदार कुलकर्णी याला अटक करण्यात आली आहे. मंदार कुलकर्णी यांनी अनेक नाट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *