Sun. Aug 18th, 2019

का लपवला सिध्दार्थ जाधवने चेहरा?

0Shares

दिवाळी म्हटले की शॉपिंग हे आलेच.आकाशकंदिलापासून ते फटाक्यांपर्यत सा-या गोष्टी बाजारपेठात उपलब्ध झाल्या आहेत. दिवाळीची खरेदी करताना रस्त्यावर चालणे देखील अवघड होते.

त्यात एखादा सेलिब्रिटी शाॅपिंगसाठी आला तर विचारायला नको. त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली असते.

आपण असे अनेक टीव्ही रियालिटी शो पाहिले असतील ज्य़ामध्ये सेलिब्रेटींना बाजारात घासाघीस करत शाॅपिंग करण्याचे टास्क दिले जाते. त्यावेळी त्यांना बघण्यासाठी लोक गर्दी करतात. सेलिब्रिटी हे सामान्य नागरिकांसारखे कुठेही फिरू शकत नाही, शाॅपिंग तर लांबचीच गोष्ट…

यंदा दिवाळीची शॉपिंग थेट मुंबईच्या मार्केटमध्ये करता यावी याकरिता मराठी अभिनेता सिध्दार्थ जाधवने नवी युक्ती लढवली आहे. त्याने चक्क तोंडाला रुमाल बांधून कुटुंबासोबत शॉपिंग करण्याचा मनसोक्त आंनद लुटला. सिध्दार्थ हा मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय अभिनेता असून त्याला सामान्य माणसासारखे आयुष्य जगायला आवडते आणि प्रत्येक सण तो सामान्य नागरिकांसारखाच साजरी करतो. 

दिवाळीची सगळी शाॅपिंग तो स्वत: करायचा मात्र आता तो मोठा स्टार झाल्याने अर्थातच रस्त्यावर चालणेही त्याला कठीण झाले आहे. त्यामुळे त्याने तोंडाला मास्क लावून शॉपिंग करण्याची शक्कल लढवली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *