Sun. Jun 20th, 2021

मराठी कलाकारांची 4 टन सामानाची मदत पूरग्रस्तांना रवाना!

सांगली कोल्हापूर आणि कोकणात असणाऱ्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ठाण्यातील कलाकार सरसावले आहेत. ठाण्यातील कलाकारांनी केलेल्या आवाहनानंतर ठाण्यात चार टन मदत जमा झाली आहे. उद्या ही मदत पूरग्रस्तांना पाठवण्यात येणार आहे.

सांगली आणि कोल्हापूर येथील निर्माण झालेल्या पूर परिस्थिती नंतर 9 ते 14 ऑगस्ट च्या दरम्यान मीठ,मिरची पावडर,माचीस, मेणबत्ती शैक्षणिक साहित्य अस देण्याचं आवाहन मराठी कलाकारंनी केलं.

त्यानंतर नाट्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नाट्यप्रेमींनी गरजेच्या वस्तू दिल्या आहेत.

ठाणे, मुंबई आणि पुण्यातील एकूण सात संस्था एकत्र येऊन त्यांनी आवाहन केलं होतं.

त्यानंतर गरजेच्या चार टन वस्तू जमा झाल्या आहेत.

या वस्तू उद्या पाठविल्या जाणार आहेत.

पूरग्रस्त भागात आता हे सामान रवाना होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेली पूरस्थिती आपणास ठाऊक असेलच.

यात माणसांना मदत करणारे शेकडो हात उभे राहतात.

परंतु जनावरांच्या मदतीसाठी मात्र फार कमी लोक उपलब्ध आहेत.

या पूरस्थितीचा जितका परिणाम माणसांवर झाला त्यापेक्षा अधिक जनावरांवर झालाय.

गाई म्हशी शेळ्या मेंढ्या यांनासुद्धा रोग होण्याची शक्यता आहे. आपण त्यासाठीची औंषध यांची माहिती जर आमच्यापर्यंत पोचवली आणि आपल्या डॉक्टरांचे एखादं पथक जर तिथे मदत करण्यास देखील रवाना झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *