Sat. Dec 14th, 2019

राज्यात सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे बंधनकारक – मुख्यमंत्री 

राज्यात सीबीएससी, आयसीएसई आणि सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे बंधनकारक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी  विधानपरिषदेत माहिती दिली आहे. यासाठी कठोर कायदा केला जाईल असं ही मुख्यमंत्री  म्हणाले आहेत.

मराठी भाषा शिकविणे सक्तीचे – मुख्यमंत्री

राज्यात सीबीएससी, आयसीएसई आणि सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे बंधनकारक होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी  विधानपरिषदेत माहिती दिली आहे.

यासाठी कठोर कायदा जाईल असं ही मुख्यमंत्री  म्हणाले आहेत.

राज्यातल्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे सक्तीचे करावे या मागणीसाठी काही जेष्ठ साहित्यिक मुंबईत आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत.

या पार्श्वभूमीवर सेनेच्या निलम गोऱ्हे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

सोमवारी होणाऱ्या या आंदोलनात लक्ष्मीकांत देशमुख, अरुणा ढेरे आणि इतर साहित्यीक उपस्थित राहणार आहेत.

साहित्यिकांच्या शिष्टमंडळाला भेटणार आहोत, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी  विनोद तावडे यांच्याकडे देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *